Chikhali : रिक्षा भाडे नाकारले म्हणून रिक्षाचालकाला केली मारहाण

एमपीसी न्यूज – रिक्षाचालकाने भाडे नाकारले म्हणून दोघांनी रिक्षा चालकालाच (Chikhali)मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी (दि.8) रात्री चिखली येथे घडली आहे.याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात दोघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी बालाजी भानुदास गायकवाड (वय 54 रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून आदित्य आडे व संजय मरगुडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पेसा कायदा महत्वाचा – केंद्रीय सचिव विवेक भारद्वाज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मेहुण्यासह (Chikhali)औषधे घेण्यासाठी रिक्षा घेऊन आले होते. यावेळी आरोपींनी त्यांना केबीसी चौकात सोडण्यास सांगितले. यावेळी फिर्यादी यांनी नकार दिला. याचा राग येवून आरोपींनी लाकडी दांडके व कोयत्याने मारहाण करून फिर्यादी यांना जखमनी केले तसेच त्यांच्या खिशातील 3 हजार 300 रुपये रोख रक्कम व 5 हजार रुपयांचा मोबाईल चोरून नेत रिक्षाची चावी फेकुन दिली.

तसेच फिर्यादी यांचा मेहुणा त्यांना वाचविण्यासाठी गेला असता त्याला देखील आरोपींनी मारहाण करत शिवीगाळ केली.यावरून चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.