Dehuroad : बस प्रवासात 77 हजारांचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज – वाकडेवाडी ते बोपोडी दरम्यान (Dehuroad) पीएमपी बस मधून प्रवास करत असलेल्या महिलेचे 77 हजार रुपये किमतीचे दागिने दोन अनोळखी महिलांनी चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 8) दुपारी दोन ते चार वाजताच्या कालावधीत घडली.

याप्रकरणी महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chikhali : रिक्षा भाडे नाकारले म्हणून रिक्षाचालकाला केली मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला डेक्कन ते निगडी असा पीएमपीएमएल बसने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान दोन महिलांनी फिर्यादी यांच्या नकळत एका पिशवी मधील 77 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हातचलाखी करून चोरून नेले. देहूरोड पोलिसांनी हा गुन्हा खडकी पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. खडकी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.