Pimpri Chinchwad RTO : जप्त केलेली वाहने सोडवून घ्या अन्यथा लिलाव

एमपीसी न्यूज – थकीत वाहन कर वसुलीसाठी पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (Pimpri Chinchwad RTO)जप्त केलेली वाहने वाहन मालकांनी सोडवून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही वाहने मुदतीत सोडवून न घेतल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून संबंधित वाहनांचा ई लिलाव केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने (Pimpri Chinchwad RTO)थकीत कर वसुलीसाठी, मोटार वाहन कायद्यातील अन्य गुन्ह्यांतर्गत चार वाहने जप्त करण्यात आली आहेत.

Alandi : तब्बल नऊ दिवसांपासून इंद्रायणी नदी फेसाळलेली

ही वाहने सोडवून नेण्यासाठी वाहन मालकांनी परिवहन कार्यालयाकडे संपर्क केला नाही. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहन मालकांना नोटीस पाठवण्यात आली. मात्र नोटीसा वाहन मालकांना पोच झाल्या नाहीत.

संबंधित वाहन मालकांनी पुढील सात दिवसात मोटार वाहन कर, दंड भरून वाहने सोडवून न्यावीत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे. वाहने सोडवून न नेल्यास त्या वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.