Chikhali : उघड्या दरवाजा वाटे घरातून तब्बल साडेतीन लाख रुपयांची चोरी करणाऱ्या चोराला अटक

एमपीसी न्यूज- घराच्या उघड्या दरवाज्यातून प्रवेश करत (Chikhali)कपाटातून तब्बल 3 लाख 40 हजार रुपयांचे सोने चोरणाऱ्या चोराला चिखली पोलिसांनी  बेड्या ठोकल्या आहेत. हा सारा प्रकार 31 डिसेंबर रोजी दुपारी पाच ते सायंकाळी सव्वा सहा या कालावधीत चिखली कुदळवाडी परिसरात घडला होता.

या घटनेवरून चिखली पोलीस ठाण्यात समिउनिस्सा मोहम्मद फिरोज खान (वय 25 रा. चिखली) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादी वरून चिखली पोलिसांनी तपास करत आरोपी प्रेमचंद प्रल्हाद यादव (वय 27.रा निगडी) याला अटक केली आहे.

PCMC : 100 व्या नाट्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादींच्या (Chikhali) घराचा दरवाजा उघडा असताना घरामध्ये शिरला त्याने बेडरूम मधील कपाटाची तिजोरी फोडून त्यातून 68 ग्रॅम वजनाचे 3 लाख 40 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी केले होते.

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. याचा पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.