Pune : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धेतील 7 मराठी चित्रपटांची घोषणा

एमपीसी न्यूज – ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सव 2024’ मध्ये होणाऱ्या (Pune) आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट स्पर्धेमधील 7 चित्रपटांची घोषणा आज महोत्सवाचे संचालक डॉ, जब्बार पटेल यांनी केली.

आज (2 जानेवारी 2024) दुपारी 2 वाजता महोत्सवाच्या www.piffindia.com या अधिकृत वेबसाईटवर या चित्रपटांची माहिती प्रदर्शित होणार आहे.

या महोत्सवात मराठी चित्रपटांच्या स्पर्धेचे परीक्षण आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्यूरी करतात. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटास 5 लाख रुपयांचा महाराष्ट्र शासनाचा ‘संत तुकाराम’ पुरस्कार दिला जातो. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’, ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’, ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’, ‘सर्वोत्कृष्ट पटकथा’ आणि ‘सर्वोत्कृष्ट छायाचित्रकारा’स प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पुरस्कार दिले जातात.

18 ते 25 जानेवारी दरम्यान ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सव 2024’ होणार आहे. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन (6 स्क्रीन), कॅम्प परिसरातील आयनॉक्स (3 स्क्रीन) आणि औंध भागातील वेस्टएंड मॉलमधील सिनेपोलीस चित्रपट गृहात (2 स्क्रीन) या तीन ठिकाणी एकूण 11 स्क्रीनवर चित्रपट दाखविले जाणार आहेत.

PCMC : 100 व्या नाट्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सवात दरवर्षी निवडले जाणारे मराठी चित्रपट महाराष्ट्राच्या विविध भागातील युवकांनी तयार केलेले असतात आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होतात, असा अनेक वर्षांचा अनुभव असून, याही (Pune) वर्षी ही परंपरा कायम राहील, असा विश्वास डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केला.

महोत्सवासाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया शुक्रवारी 23 डिसेंबरपासून www.piffindia.com या महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू झाली असून, चित्रपटगृहांवर स्पॉट रजिस्ट्रेशन प्रक्रिया 5 जानेवारीपासून सुरू होणार आहे. रसिक प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण महोत्सवासाठी नोंदणी शुल्क रुपये 800 फक्त आहे.

स्पर्धेतील मराठी चित्रपट

  • वल्ली – दिग्दर्शक: मनोज शिंदे
  • स्थळ – दिग्दर्शक: जयंत दिगंबर सोमलकर
  • भेरा – दिग्दर्शक: श्रीकांत प्रभाकर
  • श्यामची आई – दिग्दर्शक: सुजय सुनील डहाके
  • नाळ भाग 2 – दिग्दर्शक: सुधाकर रेड्डी यक्कंटी
  • छबिला – दिग्दर्शक: अनिल अमृत भालेराव
  • जिप्सी – दिग्दर्शक: शशि चंद्रकांत खंदारे

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.