Chikhali: माजी सभागृह नेते एकनाथ पवार यांची ‘व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे’ प्रभागातील नागरिकांशी चर्चा

एमपीसी न्यूज – कोरोना संदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी सभागृह नेते, प्रभाग क्रमांक 11 चे ज्येष्ठ नगरसेवक एकनाथ पवार यांनी आज (गुरुवारी) प्रभागातील नागरिकांशी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे’ चर्चा केली. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. सरकारच्या नियमांचे पालन करत सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रभागातील नागरिकांशी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे’ चर्चा करणारे ते शहरातील एकमेव नगरसेवक आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. शहरातील रुग्ण संख्या 164 वर गेली आहे. त्यापार्श्वभुमीवर माजी सभागृह नेते, ज्येष्ठ नगरसेवक एकनाथ पवार यांनी आज आपल्या प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांशी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे’ चर्चा केली. कोरोना विषाणूच्या लढ्यात घ्यावयाची काळजी. उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. नागरिकांचे प्रश्न समजावून घेतले.

नागरिकांनी भाजी मंडई, दारूचे दुकान, दैनंदिन समस्य व इतर अनेक समस्या मांडल्या. प्रत्येकाच्या प्रश्नांना पवार यांनी समर्पक उत्तर देत नागरिकांचे समाधान केले. सर्वांनी सरकारच्या नियम व अटींचे पालन करावे. अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये.

प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही पवार यांनी केले. चर्चा, प्रश्न जाणून घेतल्याबद्दल प्रभागातील नागरिकांनी एकनाथ पवार यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.