Chikhali :  कुदळवाडीत “खेळ रंगला पैठणी’चा;  महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी  न्यूज – चिखली येथील आमदार महेशदादा लांडगे सोशल फाउंडेशनच्या वतीने आमदार लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमात शिला भोसले या विजेत्या ठरल्या. त्यात त्यांनी प्रथम क्रमांकासाठीची वॉशिंग मशिन मिळविली.

स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कुदळवाडी, चिखली परिसरातील महिलांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी आमदार महेश लांडगे, नगरसेविका साधना मळेकर, संतोष मोरे, अश्विनी जाधव, सागर हिंगणे, मंगल जाधव, सोनम जांभुळकर, जितेंद्र मेहता, दत्तात्रय मोरे, रामकृष्ण लांडगे, विजयराज यादव, गणेश यादव, लालचंद यादव, पांडुरंग बालघरे, रामभाऊ कोहीनकर, साहेबराव यादव, मनोज मोरे, दत्तात्रय बालघरे, बाळासाहेब मोरे, अंकुश यादव, आबा मोरे, पांडुरंग साने, सूरज गडसिंग, सुहास ताम्हाणे, दीपक घन, किशोर लोंढे, चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.
या खेळात द्वितीय विजेत्या ठरलेल्या वंदना पवार यांना टिव्ही व तृतीय क्रमांकाच्या विजेत्या वैशाली पाटणकर यांना कुलर बक्षीस देण्यात आले. सारिका जाधव यांनी सोन्याची नथ पटकाविली. तर लकी ड्रॉमध्ये विजेत्या ठरलेल्या शिल्पा कुंभार यांनी मानाची पैठणी पटकाविली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.