BNR-HDR-TOP-Mobile

Chikhali : सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार

एमपीसी न्यूज – महिलेच्या सोशल मीडियावरील अकाउंटवर असलेले फोटो स्वतःकडे सेव्ह करत ते इतर सोशल मीडियावर बदनामी करण्याच्या उद्देशाने प्रसारित करण्याची तसेच पतीला दाखवण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार केला. ही घटना 2013 पासून 23 जून 2019 या कालावधीत चिखली येथे घडली.

याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विपुल सुरेश कासार वय 39 याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने त्यांच्या व्हाट्सअप अकाउंट वर ठेवलेले फोटो आरोपी विपुल याने स्वतःकडेच जतन करून ठेवले. कालांतराने हे जतन केलेले फोटो अन्य सोशल मीडिया साइटवर प्रसारित करण्याची तसेच महिलेच्या पतीला दाखवण्याची भीती दाखवली. आरोपी विपुल याने महिलेच्या मुलांना मारून टाकण्याची धमकी देत त्यांचे पती घरात नसताना जबरदस्तीने घरात घुसून महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी महिलेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3