chikhali News : फिनेल पिऊन विवाहितेचा सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

माहेर आणि सासरच्या मंडळींमध्ये वायसीएमसमोर हाणामारी

एमपीसी न्यूज – फिनेल पिऊन विवाहित महिलेने राहत्या घराच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. चिखलीत आज सकाळी ही घटना घडली. जखमी महिलेला उपचारासाठी वायसीएम रूग्णालयात आणले. त्यानंतर महिलेच्या सासर व माहेरच्या लोकांमध्ये वायसीएम समोरच हाणामारी झाली. यात आठ ते दहा जण किरकोळ दखमी झाले. पोलीस आणि दंगा नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आल्यानंतर वाद नियंत्रणात आला.

रूपाली आकाश पाचंगे (वय 20) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या महिलेचं नाव आहे. महिलेची प्रकृती स्थिर असून तिला पुढील उपचारासाठी अतिदक्षता विभागात हलवण्यात येणार असल्याचे वायसीएमच्या प्रमुख वैद्यकिय अधिका-यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपाली पाचंगे या महिलेने फिनेल पिऊन राहत्या घराच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. ही महिला कच-याच्या गाडीत पडली. उपचारासाठी तिला तात्काळ पिंपरीतील यशवंतराव चव्हाण (वायसीएम) रूग्णालयात हलवण्यात आले.

उपचार सुरू असताना महिलेच्या सासर व माहेरच्या लोकांमध्ये वायसीएम समोर भांडण झाले. भांडण वाढत गेले आणि दोन गटात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत आठ ते दहा जण किरकोळ जखमी झाले. यावेळी रूग्णालयातील दोन वैद्यकिय अधिका-यांच्या वाहनाची किरकोळ नुकसान झाले.

दरम्यान, दंगा वाढत चालल्याने वायसीएम सुरक्षा रक्षक विभागाचे चौधरी यांनी पोलिसांनी संपर्क करून या प्रकरणाची माहिती दिली. पोलीस आणि दंगा नियंत्रक पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर हाणामारी नियंत्रणात आली.

काही काळासाठी रूग्णालय परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.