YCMH : वायसीएममध्ये हाेणार नर्सिंग महाविद्यालय

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम (YCMH )रूग्णालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर आता रूग्णालय आवारात उभारण्यात आलेल्या 11 मजली इमारतीमधील दाेन मजल्यावर नर्सिंग महाविद्यालय उभारण्यात येणार आहे.

नर्सिंग महाविद्यालयाचा प्रस्ताव महापालिकेच्या वैद्यकीय(YCMH ) विभागाने राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. या प्रस्तावाची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांना महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

त्यानंतर पवार यांनी तत्काळ वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांना दुरध्वनी करून प्रस्ताव मंजूर करून फाईल माझ्याकडे पाठवा, अशी सूचना केली. तसेच निवासस्थान इमारतीच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली.

 

Pune : पुणे-लोणावळा सेक्शनवर उद्या मेगाब्लॉक, लोकलच्या 14 फेऱ्या रद्द

पिंपरी-चिंचवड शहरात दापाेडी ते पिंपरीपर्यंत मेट्राे सुरू झाली आहे. शहरातून मेट्राे एलिवेटेड आहे. मात्र, मेट्राे वरून धावत असताना खाली रस्त्यावर कचरा, धुळ, रस्ता दुभाजकाचा रंग गेला आहे. याकडे लक्ष देण्याची सूचना पवार यांनी आयुक्तांना करत नाराजी व्यक्त केली. मात्र, त्यांनी ते मेट्राेकडे असल्याचे सांगितले. त्यावर मेट्राेचे महाव्यवस्थापक श्रावण हर्डीकर यांच्या कानावर हा विषय घालताे, असेही पवार म्हणाले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.