Chikhali News: मोबाईल टॉवरवर लटकलेल्या मांज्यात अडकलेल्या घारीला जीवनदान

एमपीसी न्यूज – मोबाईल टॉवरवर लटकलेल्या पतंगाच्या मांज्यात घार अडकल्याची घटना रिव्हर रेसिडेन्सी चिखली येथे घडली. या घारीची मंगळवारी (दि. 15) सकाळी पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाच्या जवानांनी सुटका केली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रिव्हर रेसिडेन्सी चिखली येथे शेजारी शेजारी असलेल्या दोन मोबाईल टॉवरवर मांज्या लटकला आहे. त्यामध्ये घार पक्षी अडकला. याबाबत पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाला मंगळवारी सकाळी माहिती मिळाली. त्यानुसार अग्निशमन विभागाची तीन पथके घटनास्थळी दाखल झाली.

https://www.youtube.com/watch?v=ZcJ8Dz3FUtM

अग्निशमन विभागाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने 13 जवानांच्या पथकाने सुमारे 100 फुटांपेक्षा अधिक उंचीवर अडकलेक्या घारीची सुटका केली. मांज्यात अडकल्याने घार काही प्रमाणात जखमी झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.