Pimpri Corona Update:  शहरात आज नवीन 146 रुग्णांची नोंद; 551 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 146 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त  झालेल्या 551 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीमधील तीन रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 612 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 57 हजार 373 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 1 हजार 866 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1 हजार 744 रुग्ण गृहविलगीकरणात असून 119 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 65 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 899 आहेत. आज दिवसभरात 2 हजार 953 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 33 लाख 64 हजार  27 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.