Chikhali : निलेश नेवाळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

एमपीसी न्यूज – सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांच्या (Chikhali) वाढदिवसानिमित्त निलेशदादा नेवाळे सोशल फाऊंडेशनच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मे वाटप, आयुष्यमान भारत कार्डचे वाटप यासह पांजरपोळ येथील गोशाळेत चारावाटप व आनंदघन वृद्धाश्रम येथे धान्यवाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे (Chikhali)आयोजन करण्यात आले होते. शिवतेजनगर येथे शुक्रवारी सकाळी 10 पासून चेरी चौकात मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये हजारो नागरिकांची मोफत नेत्र तपासनी करण्यात आली. तसेच नागरिकांना मोफत चष्मे देखील वाटप करण्यात आले. सुमारे 872 गरजवंतांना यावेळी चष्म्याचे वाटप करण्यात आले.

 

Nigdi: मावळसाठी पीएमपीएमएलच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी

यावेळी मोतीबिंदू शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये सुमारे 63 नागरिकांच्या मोतीबिंदूचे निदान झाले. यावेळी आयुष्यमान भारत कार्डचे ही वाटप करण्यात आले. शिबिराचा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. यावेळी केंद्रशासन पुरस्कृत आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सुमारे 1854 नागरिकांना हेल्थ कार्ड चे वाटप करण्यात आले.

प्रभागातील नागरीक यांची नेत्र तपासणी करुन मोफत चष्मे वाटप मोतीबिंदु झालेल्या रुग्णांना निलेश दादा नेवाळे फौंडेशन आणि भारती हॅास्पीटल तसेच माई मेडिकल फौडेशन च्या वतीने मोफत शस्त्रकिया करण्यात येणार आहेत.

दरम्यान, निलेश दादा नेवाळे फौंडेशनच्या वतीने पांजरपोळ येथील गोशाळेत चारावाटप करण्यात आले तर आनंदघन वृद्धाश्रम येथे धान्यवाटप करण्यात आले.

यावेळी राजकीय, सामाजिक,शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी भेट देऊन निलेश नेवाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.