Chikhli News: स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित शिबिरात 38 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया 

एमपीसी न्यूज- चिखली येथील स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठान तर्फे स्वामी विवेकानंदांच्या 160 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा 225 गरजू लोकांनी लाभ घेतला असून 38 रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात (Chikhli News) आली आहे. तसेच 130 रुग्णांना मोफत चष्मे वाटण्यात आले.

रोटरी क्लब पिंपरी,मयूर हॉस्पिटल आणि एचडी देसाई हॉस्पिटल हडपसर आणि स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय प्रधान, सूर्यकांत जाधव,विभा झुत्शी , संतोष गिरांजे, नितीन ढमाले, सदानंद नायक याचप्रमाणे हॉस्पिटलचे डॉ. विजय भळगट,डॉ. प्रीती भळगट आणि डॉ.संजय कुलकर्णी तसेच विभागातील ज्येष्ठ नागरिक विश्वास सोहनी, डॉ.गणेश शिंदे उपस्थित होते.

Pimpri : उत्तुंग ध्येयवाद, कौशल्य, आदर्श मातृशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ – काशिनाथ नखाते

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामराजे बेबडे, महेश मांडवकर , संतोष ठाकूर, जयसिंग भोसले , विक्रमादित्य ठाकूर, शंकरराव बनकर, सुनील पंडित, सुनील खंडाळकर ,दिलीप मांडवकर, मिलिंद वेल्हाळ वेल्हाळ यांनी केले. वेळी अनेकांनी आपले मनोगतत व्यक्त केले व स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे ( Chikhli News)आभार मानले. सूत्रसंचालन रामराजे बेंबडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.