Pimpri : उत्तुंग ध्येयवाद, कौशल्य, आदर्श मातृशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज : कष्टकरी कामगार, शेतकरी, अठरापगड (Pimpri) जाती, बारा बलुतेदार यांच्यासह स्वराज्याचा ध्वज, मोहोर, राजसिंहसन, अष्टप्रधान मंडळ रयतेशी दैनंदिन जीवनातील संकल्प याविषयाचे भान, जबाबदाऱ्याचे शिक्षण राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिले आणि स्वराज्य संकल्पक म्हणून राजमाता यांनी दिलेल्या आदर्शामुळेच जुलमी अत्याचारी अन्यायाला मुठमाती देऊन रयतेचे आपले राज्य घडलं आणि त्याचा लाभ स्वराज्यातील सर्वच घटकांना झाला.

उत्तुंग ध्येयवाद, कौशल्य, आदर्श मातृशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ – असे मत कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आज व्यक्त केले.

 

स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंतीच्या (Pimpri)निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कष्टकरी संघर्ष महासंघ, बांधकाम कामगार समितीच्या वतीने आयोजित जयंतीच्या निमित्ताने ते बोलत होते.

Pimpri News : ‘मुळा नदी सुधार’साठी खासगी जागेचे भूसंपादन, नुकसान भरपाईपोटी द्यावे लागणार 175 कोटी

यावेळी उपाध्यक्ष राजेश माने महिलाअध्यक्षा माधुरी जलमुलवार, माई खांडेकर, अर्चना कांबळे, ओमप्रकाश मोरया, बालाजी बिराजदार, माया चिमणे, अनंत जाधव आदी उपस्थित होते.

 

पुढे नखाते म्हणाले, की राजमाता जिजाऊ यांनी लहानपणापासूनच त्यांचे वडील श्रीमंत लखुजीराव जाधव यांच्याकडून लाठीकाठी सह मैदानी खेळ, तलवारबाजी,दांडपट्टा चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि त्याचे शिक्षण शिवाजी महाराज यांनाही दिले. अंधश्रद्धेला मूठमाती देण्याचे काम केले. राजमाता जिजाऊनां सर्वच धर्माबाबत नितांत आदर होता. अठरापगड जाती धर्माच्या रयतेचा पालन करता असल्याची जबाबदारी व भान शिवाजी महाराजांना त्यांनी दिले म्हणूनच एक आदर्श राज्य घडले.

 

त्याचबरोबर स्वामी विवेकानंदयांनी तरुणांना खूप मोठे मार्गदर्शन केले. जो आपल्या कर्तव्याचा विचार करतो, तो पुढे जातो कर्तव्याचा विसर पडता कामा नये, सतत विधायक कामात गुंतून राष्ट्र उभारण्याच्या कार्याला सकारात्मक श्वास देतो त्याला युवक म्हणतात अशी व्याख्या विवेकानंद यांनी केली. विवेकानंदानी कायम स्वरूपी तरुणांना मार्गदर्शक तत्वे बहाल केले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.