Alandi : धर्मांतरणाविरोधात आळंदीत एकवटणार हिंदू

एमपीसी न्यूज : काही दिवसांपूर्वी आळंदीमध्ये (Alandi) धर्मपरिवर्तनाच्या  नावाखाली धक्कादायक प्रकार समोर आला होता. एका महिलेने धर्म परिवर्तन करताना येशूचे रक्त प्या असे सांगून लाल रंगाचे द्रव्य कुटुंबाला दिले असल्याचे समोर आले होते.

या धक्कादायक घटनेची दखल घेत आळंदीमध्ये दि.14 जानेवारी रोजी दुपारी साडे तीन वाजता हिंदू जनगर्जना मोर्च्यामध्ये करण्यात आले आहे. या मोर्चाची सुरुवात प्रथम सद्गुरू जोग महाराज  शिक्षण संस्थेपासून होणार आहे. हिंदू जनगर्जना मोर्चा निमित्ताने मोर्चा संबंधित कार्यकर्ते आळंदी व आळंदी पंचक्रोशीमध्ये अनेक नागरिकांच्या, संघटनेच्या व विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन नियोजना संदर्भात बैठका घेत आहेत.

Pune : लोखंडी पाईप चोरणाऱ्या टोळीला अटक

अनेक नागरिकांनी, पक्ष संघटनेनी व संस्थांनी या (Alandi) मोर्चाला पाठिंबा दिला आहे. आळंदी व परिसरात सर्वत्र या मोर्चा संबंधित फ्लेक्स लागले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.