Pune : लोखंडी पाईप चोरणाऱ्या टोळीला अटक

एमपीसी न्यूज : लोखंडी पाईप चोरी करून विकणाऱ्या (Pune) टोळीला अटक करून 34 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आलम मणियार (वय 33 वर्षे, चिखली, मूळ रा. जि. बरेली, राज्य उत्तर प्रदेश), सिद्दिकी खान (वय 45 वर्षे, रा. सिलव्हर, चिखली), दिलीप पवार (वय 43 वर्षे, रा.चिंचवड), अमित वाळंज (वय 32 वर्षे, रा. पोमगाव, मुळशी) या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

26 डिसेंबर ते 27 डिसेंबर रोजी सहारा आंबे व्हॅलिसिटी येथे अज्ञात चोरट्यांनी 36 लोखंडी गोलाकार पाण्याचे ( लांबी 20 फूट व व्यास 1/2 इंच) प्रत्येकी 5,000 रुपये किंमतीचे पाईप असा एकूण 1.80 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

याबाबत सुमित कुमार अब्बड (वय 37 वर्षे, रा. आंबे व्हॅलिसिटी, आंबवणे, ता मुळशी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पौड पोलीस ठाण्यात भादवि कलम 379 अन्वये 30 डिसेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात (Pune)आला होता.

Pimpri News : ‘मुळा नदी सुधार’साठी खासगी जागेचे भूसंपादन, नुकसान भरपाईपोटी द्यावे लागणार 175 कोटी

या गुन्ह्याचा तपास करत असताना वापरण्यात आलेली इनोव्हा कार पोलिसांना सापडली. या कारद्वारे पोलिसांनी सदर चार आरोपींना अटक केली.

या गुन्ह्यातील 36 लोखंडी पाईप मुद्देमालापैकी 50 हजार किंमतीचे एकूण दहा लोखंडी पाईप आणि गुन्ह्यात वापरलेला ट्रक आणि कार जप्त करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.