Chinchwad : वाल्हेकरवाडी येथे ओढ्याच्या कडेला सापडले स्त्री जातीचे अर्भक

एमपीसी न्यूज – वाल्हेकरवाडी येथील (Chinchwad) पंडित वाल्हेकर बिल्डींग शेजारी असणाऱ्या ओढ्याच्या कडेला रविवारी (दि.12) सकाळी पोलीस शिपाई सोमा काशिनाथ मुठे यांना एक स्त्री जातीचे अर्भक सापडले.

Kondhwa : सासूला अद्दल घडवण्यासाठी सुनेनेच चोरले घरातील सोने

या प्रकरणी मुठे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे त्यांच्या कर्तव्यावर असताना त्यांना ओढ्यात पाण्याच्या कडेला नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक दिसले. त्या अर्भकाला फिर्यादी (Chinchwad) यांनी ताब्यात घेत त्याला टाकणाऱ्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.