Kondhwa : सासूला अद्दल घडवण्यासाठी सुनेनेच चोरले घरातील सोने

एमपीसी न्यूज – घरात सासूकडून त्रास होत (Kondhwa) असल्याचे कारण देत सुनेनेच घरात चोरी झाल्याचा बनाव केला होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या उलट तपासणीमध्ये सून सापडली. कोंढवा पोलिसांनी सुनेसह अन्य तिघांना अटक केली आहे. हा प्रकार 2 फेब्रुवारी रोजी कोंढवा येथील मिठानगर येथे घडला होता.

कासीम बुरानसाब नाईकवाडी (वय 21, रा. जेवरगी झोपडपट्टी, ता. जेवरगी, जि. गुलबर्गा, कर्नाटक), मेहबुबसाब अब्दुलसाब बदरजे (वय 25, रा. निलकोड ता. जेवरगी, जि. गुलबर्गा, कर्नाटक), अब्दूल दस्तगीर मुल्ला (वय 19, रा. गाव येड्रामी आंबेडकर चौक ता. येड्रामी, जि. गुलबर्गा, कर्नाटक) आणि 30 वर्षीय सुनेला पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी आरोपी सुनेच्या सासूने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा परिसरातील मिठानगर परिसरात चोरट्यांनी 2 फेब्रुवारी रोजी फिर्यादी यांच्या घरात शिरून तोंडावर टॉवल गुंडाळून सोन्याच्या बांगड्या आणि सुनेच्या गळ्यातील गंठण चोरुन नेले.

Alandi : आळंदीमध्ये संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त भाविकांची गर्दी

पोलिसांनी सुनेकडे चौकशी केली असता, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांना सुनेवर संशय आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तांत्रिक माहितीच्या आधारे चोरटे कर्नाटकातील गुलबर्गामध्ये असल्याची माहिती पोलीस अंमलदार महेश वाघमारे यांना (Kondhwa) मिळाली.

पोलिसांच्या पथकाने गुलबर्गा येथून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता फिर्यादी या सुनेला कौटुंबिक कारणावरुन वेळोवेळी मानसिक व शारीरिक त्रास देत होत्या. तसेच, तिचे सोन्याचे दागिने हे तिला देत नव्हते.

Alandi : आळंदीमध्ये संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त भाविकांची गर्दी

त्यामुळे तिने आरोपी कासीम नाईकवडी याला तिच्या घरातून दागिने चोरुन नेण्यास सांगितल्याचे तपासात उघड झाले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे करीत आहेत.

ही कारवाई कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनावणे, पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार अमोल हिरवे, महेश वाघमारे, गणेश चिंचकर, राहुल रासगे, अभिजीत रत्नपारखी, राहुल थोरात, सुहास मोरे, विकास मरगळे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.