Alandi : आळंदीमध्ये संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज : आळंदी येथील श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये (Alandi) संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिरामध्ये काही भाविक ग्रंथ पारायण करताना दिसत होते.

Mulshi : राजगडाच्या पायथ्यालाच मुळशीतील पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

संत गजानन महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त मंदिरामध्ये भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. येथील मंदिर व मंदिरा भोवतालचा परिसर अतिशय सुंदर असल्याने फोटो घेण्याचा मोह भाविकांना नेहमीच होतो.

मंदिरात आकर्षक अशी फुल सजावट करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील स्वच्छता (Alandi) राखण्याचे काम सेवेकरी वारंवार करताना दिसत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.