Khed : खून करून मृतदेह फेकला ओढ्यात

एमपीसी न्यूज – डोक्यात व छातीवर मारहाण करत (Khed) एका 40 ते 42 वर्षीय इसमाचा खून करून त्याचा मृतदेह शेताच्या कडेला ओढ्यात फेकून देण्यात आला आहे. हा प्रकार खेड तालुक्यातील देशमुखवाडी येथे शनिवारी (दि.11) दुपारी उघडकीस आला.

याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात राजू किसन राठोड (वय 42 रा. खराबवाडी) यांनी फिर्याद दिली असून अज्ञाता विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad : वाल्हेकरवाडी येथे ओढ्याच्या कडेला सापडले स्त्री जातीचे अर्भक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयताची अद्याप ओळख पटलेली नसून त्याचे वय अंदाजे 40 ते 42 वर्ष आहे. त्याच्या डोक्यावर व छातीवर मारहाण करून खून करण्यात आला आहे. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने देशमुखवाडी येथील शेतकरी बाळू निवृत्ती देशमुख यांच्या शेतातील ओढ्यात टाकून देण्यात आला होता.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून प्रेत (Khed) शवविच्छदेनासाठी पाठविले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.