Baner : खंडणी मागत खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या महिलेसह एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – ही माझी जागा आहे, म्हणत येथे व्यवसाय (Baner) करायचा असेल तर दररोज मला 300 ते 500 रुपये द्यायचे नाही तर माझी मुलगी वकील आहे, खोट्या केसमध्ये अडकवेण अशी धमकी देणाऱ्या महिला व तिच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी तुषार मल्हारी कोकरे (वय 18, रा. कोथरूड) याने फिर्याद दाखल केली असून महिला आरोपी (वय 52) व विठ्ठल वाडकर (वय 58) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बाणेर येथे मागील एक वर्षापासून सुरु होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोबत नारळवाला विशाल व भाजी विक्रेता प्रमोद धनावडे असे दोघे बिटवाईज कंपनी समोर व्यवसाय करत होते. त्यांना आरोपी महिलेने येऊन ही माझी जागा आहे, इथे तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, तर दररोज 300 ते 500 रुपये हप्ता द्यावा लागेल.

Chinchwad : वाल्हेकरवाडी येथे ओढ्याच्या कडेला सापडले स्त्री जातीचे अर्भक

पैसे दिले नाही, तर माझी मुलगी वकील आहे, तुम्हाला खो्ट्या छेडछाड (Baner) व रेप केसमध्ये अडकवू अशी धमकी दिली. व भाज्या रस्त्यावर फेकून दिल्या. त्यानंतर वारंवार भाज्या नेत पैसे दिले नाहीत. हप्ता घेतला. अश्लिल शिवीगाळ केली.

तसेच, हप्ता वाढवून मागितला तो दिला नाही तर तुम्ही कोयता गँगचे सदस्य आहात, असे सांगून पोलिसात अडकवेण अशी धमकी दिली. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.