Chinchwad : रेल्वे प्रशासनाने रेल्वे रुळावरील मोठे दगड हटवल्याने मोठी दुर्घटना टळली

एमपीसी न्यूज : पुणे विभागातील रेल्वे प्रशासनाने काही समाजकंटकांनी (Chinchwad) रेल्वे रुळांवर लावलेले मोठे दगड वेळीच हटवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. चिंचवड-आकुर्डी विभागात शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास  चिंचवड ते आकुर्डी रेल्वे स्थानकादरम्यान (किलोमीटर 172/7-8) ही घटना घडली.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मोठे दगड अप लाईनच्या ट्रॅकवर टाकण्यात आले होते. रेल्वे विभागातील नागरी अभियांत्रिकी विभागाचे रेल्वे कर्मचारी या विभागात रुटीन ट्रॅक मेंटेनन्स वेल्ड टेस्टिंगच्या कामासाठी गेले असताना, कर्मचाऱ्यांनी पाहिले की यूपी लाईनच्या ट्रॅकवर मोठे दगड ठेवण्यात आले होते.

त्याच वेळी पुण्याहून मुंबईकडे कोल्हापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे (11030) जाणार होती. रेल्वे येण्यापूर्वी हा प्रकार उघडकीस आला

Pune : वाहतूककोंडी टाळण्यासाठी येरवडा, मुंढवा, कोरेगाव पार्क भागात जड वाहनांना बंदी

कर्मचार्‍यांनी वेळेवर केलेल्या या गैरकृत्याचा शोध घेतल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता टळली. पुढील तपास आरपीएफ (Chinchwad) आणि जीआरपीकडून सुरू आहे.

पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलेल्या उदयपुर-जयपूर वंदे भारत एक्सप्रेसच्या मार्गात अज्ञातांनी दगड आणि लोखंड ठेवले होते. मोठा घातपात करण्याचा प्रयत्न रेल्वे विभागाने हाणून पाडला होता. ही घटना 24 सप्टेंबर रोजी घडली होती. ही घटना ताजी असतानाच पुणे येथे लोहमार्गावर दगड ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.