Pune : वाहतूककोंडी टाळण्यासाठी येरवडा, मुंढवा, कोरेगाव पार्क भागात जड वाहनांना बंदी

एमपीसी न्यूज – येरवडा, मुंढवा, कोरेगाव पार्क भागात होणारी  (Pune) वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दररोज सकाळी आणि सायंकाळी या भागातील रस्ते अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी जाहीर केलेल्या पत्रकानुसार, येरवडा, मुंढवा, कोरेगाव पार्क भागातील रस्त्यांवर 8 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 6 ते रात्री 1 पर्यंत जड वाहनांना मनाई करण्यात आली आहे.

नगर रस्त्यावरून शास्त्रीनगर चौक आणि रामवाडी चौक येथून आगाखान पूलमार्गे कोरेगाव पार्क, तसेच मुंढव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दररोज सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत जड वाहनांना मनाई करण्यात आली आहे.

Pune Metro : मेट्रोकडून विद्यार्थ्यांसाठी आता तिकीट दरात 30 टक्के सवलत

कोरेगाव पार्क परिसरातून साऊथ मेन रस्ता, नॉर्थ मेन रस्ता, बर्निंग घाट रस्त्यावरुन एबीसी फार्म हाऊस चौकमार्गे (Pune) कल्याणीनगर आणि मुंढव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर जड वाहनांना मनाई करण्यात आली आहे. मुंढव्यातील ताडीगुत्ता चौकातून कोरेगाव पार्क येणाऱ्या रस्त्यावर जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे, असे मगर कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.