Chinchwad : चिंचवड प्राधिकरण अग्रवाल समाज ट्रस्टच्या वतीने अग्रसेन जयंती महोत्सव साजरा

एमपीसी न्यूज – अग्रवाल समाजाचे कुलपिता, सत्य, अहिंसा आणि समाजवादचे प्रणेता महाराजा श्री अग्रसेन यांच्या जन्मोत्सवानिमित्त चिंचवड प्राधिकरण अग्रवाल समाज ट्रस्टच्या वतीने अग्रसेन जयंती महोत्सवाचे आयोजन चिंचवड येथील अग्रसेन भवन येथे करण्यात आले होते.

यामध्ये विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमा सोबत महिला व लहान मुलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजित केले होते. या प्रसंगी दिल्ली येथून आलेल्या सर्व भजनी मंडळींनी अप्रतिम भजने सादर केली. माँ भगवतीची “भव्य माता की चौकी ” चे भजनगायक नरेश सैनी, रमेश ओबेरॉय, अंजली सागर आणि मुकेश गोयल यांनी भजने प्रस्तुत केली. यावेळी अग्रवाल समाज फेडरेशनचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमाला सुनील अग्रवाल,सुनील मित्तल ,विनोद मित्तल, नरेश मित्तल, वेद मित्तल, अनिल अग्रवाल,निरंजन अग्रवाल,जगदीशप्रसाद सिंघल,के. एल बंसल, भीमसेन अग्रवाल, प्रेमचंद मित्तल, रामवतार अग्रवाल, देवीचंद अग्रवाल, माजी आमदार अण्णा बनसोडे, राहुल जाधव, विजय मित्तल, मुकेश मित्तल, रोहित अग्रवाल आणि अग्रवाल समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.