Chinchwad : मित्र सतत घरी येतो म्हणून केली मारहाण

एमपीसी न्यूज – मित्राचा मित्र हा सतत काही कारण नसताना (Chinchwad) घरी येतो म्हणून तरुणाला बेदम मारहाण कऱण्यात आली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.12) वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडला.

या प्रकरणी 34 वर्षीय महिलेने चिंचवड येथे फिर्याद दिली असून अजय दत्ता नागटिळे (वय 25, रा.वाल्हेकरवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

NDRF News : आगामी जी 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या जवानांना प्रशिक्षण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ नितीन याचा मित्र सुनील हा आरोपीच्या घरी सतत जात होता. याचा राग येऊन आरोपीने नितीनवर चाकूने जिवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर हल्ला करत जखमी केले.

यावेळी सुनील भांडणे सोडविण्यासाठी आला असता आरोपीने सुनील यालाही चाकूने (Chinchwad) मारत जखमी केले आहे. चिंचवड पोलिसांनी पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.