NDRF News : आगामी जी 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या जवानांना प्रशिक्षण

एमपीसी न्यूज – आगामी होऊ घातलेल्या जी 20 परिषदेमध्ये (NDRF News) सुरक्षा राखण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलच्या (एनडीआरएफ) जवानांना विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात एनडीआरएफच्या पाच, सहा, सात आणि तेराव्या तुकडीचे 82 अधिकारी आणि जवान सहभागी झाले होते.

भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या वतीने हे प्रशिक्षण देण्यात आले. सारस सेठ यांच्या हस्ते प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन झाले. अणुऊर्जा विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक आर बी के यादव डॉ. शशांक सैंदाणे, अनिरुद्ध चंद्रा, तेजाराम मीना यांनी सुरक्षेच्या विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

Pune : पुण्यातील प्रसिद्ध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये राडा; मारहाणीत एकाचा खून

प्रमुख पाहुणे ए के नायक यांनी जवानांना मार्गदर्शन केले. राष्ट्राच्या विकासात अणुऊर्जेचे महत्त्व या विषयावर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. शिबिराच्या समारोप प्रसंगी पाचव्या तुकडीचे कमांडंट संतोष बहादुर सिंह (NDRF News) यांनी मार्गदर्शन केले. तसेच आयोजित केलेल्या या प्रशिक्षण शिबिराबद्दल आभार व्यक्त केले. प्रशिक्षणा दरम्यान जवानांकडून मॉक ड्रिल देखील करून घेण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.