Alandi : अवकळी पावसाने विद्युत पुरवठ्याच्या समस्यांमध्ये वाढ

एमपीसी न्यूज : आळंदी शहरात रविवार 9 एप्रिल बुधवार 12 एप्रिल, गुरुवार 13 एप्रिल रोजी अवकाळी झालेल्या जोरदार (Alandi) पावसामुळे व सुसाटाच्या वाऱ्यामुळे काही वेळेपूर्ता विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तसेच, पावसासह सुसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरात काही ठिकाणी विद्युत पुरवठा बंदच्या समस्या निर्माण झालेल्या होत्या. त्या दुरुस्त करून समस्या सोडवण्याचे काम सुरू होते.

तसेच, गेल्या काही दिवसांपासून आळंदी शहराला विद्युत पुरवठा करणाऱ्या प्रमुख विद्युत विभागातील केंद्रात होत असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे शहरात वीज पुरवठा खंडीत व वीज पुरवठा कमी दाबाने (डीम) होत आहे. त्यामुळे आळंदी शहरात सर्वत्र पाणी पुरवठा उशिराने होत आहे.

Pune : पुण्यातील प्रसिद्ध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये राडा; मारहाणीत एकाचा खून

जलकेंद्र पुरवठा विभागात विद्युत पुरवठा कमी दाबाने (डीम) असल्याने व काही वेळ तो खंडित राहिल्याने शहरात विविध ठिकाणी पाणीपुरवठा सद्यस्थितीत वेळेवर होत नाही. याबाबत माहिती पाणीपुरवठा अधिकारी अक्षय शिरगिरे यांनी दिली.
प्रमुख विद्युत पुरवठा (Alandi) विभागातील तांत्रिक समस्या आज संध्याकाळच्या आत सुटेल याबाबत माहिती विद्युत कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.