Pune : पुण्यातील प्रसिद्ध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये राडा; मारहाणीत एकाचा खून

एमपीसी न्यूज : पुण्यातील लोह परिसरात (Pune) असणाऱ्या एका प्रसिद्ध महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या दोन गटात भांडणावरून झालेल्या बेदम मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. किरकोळ वादातून हा सर्व प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटकही केली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या खूनातील आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

शंतनु शिवराज चाटे (वय 19, रा. आळंदी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, त्याच्या अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. त्यांचा साथीदार दिलीप बाबुराव हांगे हा पसार झाला आहे. या घटनेत अमितकुमार विश्वकर्मा (वय 21) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.

लोहगावमधील महाविद्यालयात 7 एप्रिल रोजी स्नेह संमेलनचा कार्यक्रम पाहण्यास अमितकुमार गेला होता. आरोपीही महाविद्यालयात संमेलन पाहण्यास आले होते. त्यावेळी गेटसमोर गाडी आडवी घातल्यावरून त्यांच्यात वाद झाला. वादातून तिघांनी अमितकुमार याला बेदम मारहाणकरून गंभीर जखमी केले.

Pune Crime : ब्लॅकमेल करत विवाहित प्रेयसीवर पाच वर्षापासून बलात्कार; गुन्हा दाखल

त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू होते. या प्रकरणात प्रथम पोलिसांनी गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला होता. परंतु, उपचार सुरू (Pune) असताना अमितकुमारचा मृत्यू झाला. त्यानंतर याप्रकरणी खूनाचे कलम वाढविण्यात आले होते.

दरम्यान, ही मारहाण कोणी केली? याबाबत थांगपत्ता नव्हता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पथक करत होते. वरिष्ठ निरीक्षक गणेश माने व त्यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासले. खबऱ्यामार्फत माहिती घेतली. त्यावेळी पोलिसांना मारहाण करणारे तिघे लोहगाव येथे उभे असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार, पथकाने त्यांना पकडले. त्यावेळी त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.