Pune Crime : ब्लॅकमेल करत विवाहित प्रेयसीवर पाच वर्षापासून बलात्कार; गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : प्रेम संबंधाचा गैरफायदा घेऊन ब्लॅकमेल (Pune Crime) करत एका 26 वर्षीय विवाहितेवर 2018 पासून वारंवार बलात्कार करणाऱ्या एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. 2018 ते 2023 या कालावधीत आरोपीने वारंवार पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार केले.

हेमंत संजय वैराट असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 26 वर्षीय विवाहित महिलेने तक्रार दिली आहे.

Hadapsar : दवाखान्याचा खर्च वाढत असल्याने वडिलांनीच केला तरुण मुलाचा खून

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी सोबत असलेल्या प्रेमसंबंधाचा फायदा घेऊन आरोपीने तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देऊन तिला बोलावून घेत कारमध्ये जबरदस्तीने शरीर संबंध प्रस्थापित केले. या घटनेचे फोटो मोबाईलमध्ये काढून घेत फिर्यादीने पुन्हा भेटण्यास नकार दिला असता हे फोटो तिच्या पतीला दाखवण्याची धमकी दिली. त्यानंतर वारंवार तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले.

दरम्यान फिर्यादी तरुणीने आरोपीचे फोन उचलले नसता (Pune Crime) त्याने तिच्या घरात येऊन माझा फोन का उचलत नाही? मला भेटायला न आल्यास मी काय करायचे ते बघतो असे म्हणत धमकी दिली. दत्तवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.