Hadapsar : दवाखान्याचा खर्च वाढत असल्याने वडिलांनीच केला तरुण मुलाचा खून

एमपीसी न्यूज : डोक्याला मार लागल्याने सहा (Hadapsar) महिन्यापासून घरात बेडवर झोपून असलेल्या मुलाचा वडिलांनीच खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काळेपडळ परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. हडपसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी संबंधित वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजीत बाबुराव जायभाय (वय 28) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील बाबुराव दिनकर जायभाय (वय 50) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाची आई सुनिता बाबुराव जायभाय (वय 45) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

Pune News : वादळी पावसाचा पुण्यातील वीजयंत्रणेला पुन्हा तडाखा

अधिक माहिती अशी की, मयत अभिजीत जायभाय याला सहा महिन्यापूर्वी डोक्यात मार लागला होता. त्यामुळे तो काहीही काम न करता घरातच बेडवर सतत झोपून असायचा. दरम्यान आरोपी वडील वारंवार त्याला जगून काही उपयोग नाही असे म्हणायचे.

तसेच तो काहीही कामधंदा करीत नसल्याने त्यांचा राग सतत वाढत होता. अभिजीत याचा दवाखान्याचा खर्चही विनाकारण वाढत असल्याचा राग मनात धरून गळा आवळून वडीलाने त्याचा खून (Hadapsar) केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.