Chinchwad : प्रतिभा कॉलेजमध्ये बुधवारी बिझनेस डेव्हलपमेंट सेमिनार

एमपीसी न्यूज- भारतीय जैन संघटना, पिंपरी-चिंचवड यांच्यातर्फे बिझनेस डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे आयोजन बुधवारी (दि.19) चिंचवड येथे करण्यात आले आहे. व्यापार व्यवसायातील वेगवेगळ्या अडचणी, तणाव, तसेच आधुनिक युगातील बदलत्या तंत्रज्ञानाच्या आधारे व्यवसाय कसा वाढवावा याविषयी मार्गदर्शन या सेमिनारमध्ये करण्यात येणार आहे.

व्यापार व्यवसाय झपाट्याने बदलत असताना या बदलत्या परिस्थितीला सामोरे कसे जावे तसेच वेगवेगळ्या अडचणींचा सामना कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय जैन संघटना पिंपरी चिंचवड यांनी ‘बदलोगे तो बढोगे’ या बिझनेस डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे आयोजन केले आहे. बुधवार दि १९ रोजी हा सेमिनार दुपारी 1 वाजता चिंचवड येथील प्रतिभा कॉलेजमध्ये होणार आहे. बिझनेस अभ्यासक राकेश जैन हे या सेमिनारमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. व्यापारी वर्ग युवा उद्योजक ते विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांसाठी हा सेमिनार खुला असून यासाठी १०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे.

आधुनिक युगातील बदलत्या तंत्रज्ञानाच्या आधारे व्यवसाय कसा वाढवावा, व्यवसायात काय बदल करावेत तसेच युवा पिढीला पारंपरिक व्यवसायाची आवड निर्माण करून त्यांनाही व्यवसाय करण्यासाठी कसे उद्युक्त करावे या विषयी सखोल मार्गदर्शन राकेश जैन यांच्याकडून होणार आहे. व्यापार व्यवसायातील बदलती परिस्थिती, निरनिराळ्या अडचणी यामुळे व्यवसायात येत असलेला तणाव या विषयी व्यापारी वर्गाला योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.