Pimpri : शिवरायांकडून एकोपा व सलोखा कसा राखावा ते शिका- प्रा. नामदेवराव जाधव

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराजांनी सकलजनांचा एकत्रित ( Pimpri ) विचार कसा केला. ऐक्य व एकोपा घडवून आणला हे गुण तरुण पिढीने शिकणे गरजेचे आहे, असे मत व्याख्याते प्रा. नामदेवराव जाधव यांनी व्यक्त केले.

चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज् व प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट मध्ये सोमवारी (दि.19) शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी जाधव बोलत होते.

Man : आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा – शोभा जोशी

प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज् येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी प्रा. नामदेवराव जाधवप्रसिद्ध उद्योजिका हेमा राचमालेप्रायार्य डॉ. अरुणकुमार वाळुंजउपप्राचार्य डॉ.क्षितिजा गांधीडॉ. वनिता कुर्‍हाडेमुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरियाप्रा. रोहित आकोलकरप्रा. अश्लेषा देवळेप्रा. पांडुरंग इंगळे उपस्थित होते.

तरप्रतिभा इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट येथे इतिहास संशोधक प्रा.डॉ. प्रमोद बोराडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी एम.बी.ए.चे संचालक डॉ. सचिन बोरगावेशिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम उपस्थित होत्या. संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.दिपक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रस्तावना एम.बी.ए.चे संचालक डॉ. सचिन बोरगावे यांनी केले. या दोन कार्यक्रमाचे नियोजन प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी ( Pimpri ) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.