Chinchwad Bye Election: दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी टपाली मतदानाची सुविधा

एमपीसी न्यूज  – चिंचवड विधानसभा मतदार (Chinchwad Bye-Election) संघाच्या पोटनिवडणुकीसाठी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना मतदान करणे सोपे होणार आहे. 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना प्रथमच घरामधून टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली आहे.

चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सर्व संबंधित समन्वयक अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला निवडणूक कामकाजातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. देशमुख म्हणाले, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना नमुना 12-डी हा अर्ज वेळेत भरून घ्यावा, त्यादृष्टीने आवश्‍यक नियोजन करण्यात यावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

Kalewadi News: बेकायदेशीर झोपड्यांवर 15 दिवसात कारवाई करा, अन्यथा आंदोलन; रिदम हाऊसिंग सोसायटीचा इशारा

मतदारांना सुलभ मतदान करता यावे यासाठीच्या सुविधांची (Chinchwad Bye-Election) माहिती द्यावी. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जागृतीचे कार्य करावे. सी-व्हीजील ऍपवरील तक्रारींचे कालमर्यादेत निवारण होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. निवडणूक आयोगाच्या सर्व सूचनांचे पालन करावे.

निवडणुकीशी संबंधित सर्व अहवाल वेळेवर द्यावेत आणि कालमर्यादेत कामे करावीत. नागरिकांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या. दरम्यान, चिंचवड विधानभा मतदार संघात पुरूष मतदार 3 लाख 1 हजार 648, महिला मतदार 2 लाख 64 हजार 732 तर इतर 35 असे 5 लाख 66 हजार 415 एवढे मतदार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.