Chinchwad : जाणता राजा प्रतिष्ठानच्या वतीने संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा

एमपीसी न्यूज – जाणता राजा प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संभाजीनगर मधील बर्ड व्हॅली उद्यान येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

जाणता राजा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी हा सोहळा साजरा करण्यात येतो. यावेळी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक विकास आहेर, समाधान पाटील, अंगद गायकवाड, सोन्या आहेर, बाळू गायगोळ , खंडू गुरव, पंकज कडू, अमोल कळंब, राजा सिंग, आकाश राक्षेतसेच चिंचवड मधील शिव शंभू प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली उद्यानातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीला दही, दुधाने अभिषेक करण्यात आला. तसेच मूर्तीच्या परिसरात स्वछता करण्यात आली. उद्योजक सचिन आहेर यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती क्षात्रवीर संभाजी महाराज यांचा इतिहास आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी असून शंभुराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने युवकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अध्यक्ष अजिंक्य आहेर यांनी सांगितले. समारोप रुपेश कोकाटे यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.