Chinchwad Crime News : फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 21 फेब्रुवारी 2019 ते 25 ऑगस्ट 2021 या कालावधीत सिंहगड रोड, पुणे येथे घडली.

विराज प्रकाश जोशी, प्रकाश केशव जोशी आणि दोन महिला (सर्व रा. सिंहगड रोड, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने बुधवारी (दि. 25) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी विवाहितेकडे ‘आईच्या नावावर असलेले घर विकून नवीन मोठा फ्लॅट घेण्यासाठी पैसे घेऊन ये’ अशी पैशांची मागणी केली. त्यासाठी विवाहितेने विरोध केला असता आरोपींनी विवाहितेला मारहाण, शिवीगाळ करून मानसिक व शारीरिक त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.