Chinchwad Crime News : लघुशंकेसाठी थांबलेल्या डिलिव्हरी बॉयची पार्सलबॅग चोरट्यांनी पळवली

एमपीसी न्यूज – डिलिव्हरी देण्यासाठी निघालेला एक डिलिव्हरी बॉय बिजलीनगर येथे लघुशंकेसाठी थांबला. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी डिलिव्हरी बॉयची पार्सल बॅग चोरून नेली. त्यामध्ये 11 हजार 82 रुपये किमतीचे 18 पार्सल होते. ही घटना रविवारी (दि. 8) दुपारी पावणे तीन वाजता बिजलीनगर, चिंचवड येथे एमआयडीसी कॉलनीच्या जवळ घडली.

भीमचंद अंकुश भालेराव (वय 32, रा. निगडी) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भालेराव एका खाजगी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. रविवारी दुपारी ते चिंचवड परिसरातील पार्सलची डिलिव्हरी देत होते. दुपारी पावणे तीन वाजता ते बिजलीनगर येथील एमआयडीसी कॉलनी जवळ लघुशंकेसाठी थांबले. त्यावेली त्यांनी त्यांची 11 हजार 82 रुपयांची पार्सल बॅग त्यांच्या दुचाकीवर ठेवली. त्यावेळी एका दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरटयांनी त्यांची पार्सल बॅग चोरून नेली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.