Chinchwad Crime News : कपड्याचे दुकान फोडून दोन लाखांची रोकड चोरीला

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी कपड्याचे दुकान फोडून एक लाख 98 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 30) सकाळी सहा वाजताच्या सुमारास शांतीनिकेतन, चिंचवड येथे उघडकीस आली.

संदेश शांतीलाल चोपडा (वय 33, रा. लिंकरोड चिंचवडगाव) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चोपडा यांचे शांतीनिकेतन चिंचवड येथे सायिनकर इमारतीत कपड्याचे दुकान आहे. रविवारी (दि. 29) रात्री दहा वाजता फिर्यादी यांनी त्यांचे दुकान बंद केले. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे लोखंडी शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील लाकडी कपाटाचे लाॅक तोडून एक लाख 98 हजार रोख रक्कम चोरून नेली. हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक रणवरे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.