Chinchwad Crime News : बस प्रवासादरम्यान महिलेचे गंठण पळवले

एमपीसी न्यूज – बस प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्यांनी एका प्रवासी महिलेचे 45 हजार रुपये किमतीचे गंठण चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 18) सकाळी पावणेबारा वाजताच्या सुमारास निगडी जुना बस स्टॉप ते चाफेकर चौक या मार्गावरील बस प्रवासादरम्यान घडली.

याप्रकरणी यमुनानगर येथील एका महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला बुधवारी सकाळी पावणेबारा वाजताच्या सुमारास निगडी येथील जुना बस स्टॉप येथून पीएमपीएमएल बसने चाफेकर चौकाकडे जात होत्या. 20 मिनिटानंतर त्या चाफेकर चौकात उतरल्या आणि चालत चिंचवडगाव येथील एका ज्वेलर्सच्या दुकानात गेल्या. या प्रवासादरम्यान त्यांनी त्यांचे तुटलेले 45 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण त्यांच्या बॅगमध्ये ठेवले होते. प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांचे गंठण चोरून नेले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.