Chinchwad : श्री जैन श्रावक संघाकडून पाच दिवसीय होळी चातुर्मासचे आयोजन

एमपीसी न्यूज – श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, चिंचवड ( Chinchwad)  यांच्यातर्फे 23 ते 29 मार्च दरम्यान सुखी धर्म सभामंडप चिंचवड स्टेशन येथे ‘पवित्र होळी पंच दिवसीय चातुर्मास’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषीजी यांचे शिष्य अर्हम विज्जा प्रणेता, उपाध्याय प्रवर श्री प्रवीणऋषी यांच्या सानिध्यात हा सोहळा संपन्न होणार आहे.
प्रवीण ऋषी यांचे 23 मार्च रोजी चिंचवड येथे आगमन झाले. त्यानंतर पंच दिवसीय पवित्र होळी चातुर्मासाची सुरुवात झाली. यानंतर 24 ते 28 मार्च दरम्यान पाच दिवसीय विशेष सामायिक दिन, एकासना दिन, आनंद गुरवे नमः जाप, दया दिन आणि आयंबिल दिन साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
या दरम्यान कार्यक्रम स्थळी विविध शिबिरे, प्रवचन जिनवणी, गौतम निधी परिवार संमेलन, आनंदगाथा प्रवचन, गौतम प्रसादी, गौतमनिधी कलश वितरण अनुष्ठान, अर्हम नाईट्स, अर्हम विज्जा इत्यादी कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.
28 मार्च रोजी राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषी यांच्या 32 व्या आनंदस्मृती दिनानिमित्त गुरुमंत्र दीक्षा कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. 29 मार्च रोजी सकाळी 7.30 वाजता चिंचवड स्टेशन गुरुदेव यांचा सुखी विला पवनानगर येथे विहार (प्रस्थान) होईल.
जैन आणि अजैन भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात ( Chinchwad)  आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.