Chinchwad : मंगलमूर्ती पालखी शुक्रवारी मोरगावकडे प्रस्थान ठेवणार

एमपीसी न्यूज – श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावीप्राप्त श्री मंगलमूर्ती पालखी शुक्रवारी (दि. 30) दुपारी बारा वाजता मोरगावकडे प्रस्थान ठेवणार आहे. भाद्रपदी यात्रा-पालखी श्री मोरया गोसावी मंदिरात दर्शन घेऊन भव्य मिरवणुकीने प्रस्थान करणार आहे.

पालखी प्रस्थानासाठी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणूक सोहळ्यात ढोल-ताशा, ध्वजपथक, हरिपाठ मंडळे, भजनी मंडळे, बँड पथक सहभाग घेणार आहेत. पालखी सोहळ्यासाठी महापौर, उपमहापौर, आमदार, नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

शुक्रवारी (दि. 30) चिंचवड येथून प्रस्थान होणार आहे. पहिला मुक्काम कसबा पेठ पुणे येथील एकनाथ मंगल कार्यालयात असेल. शनिवारी (दि. 31) पालखी सासवड येथील क-हाबाई मंदिरात मुक्कामी असेल. रविवारी (दि. 1) मोरगाव येथे पोहोचणार आहे. मोरगावमधून बुधवारी (दि. 4) दुपारी दोन वाजता पालखी निघेल आणि जेजुरी येथे मुक्कामी असेल. गुरुवारी (दि. 5) सासवड. शुक्रवारी (दि. 6) दिव्य वाटिका आश्रम वडकीनाला, शनिवारी (दि. 7) कसबा पेठ पुणे येथील एकनाथ मंगल कार्यालय आणि रविवारी (दि. 8) पालखी चिंचवडगावात पोहोचणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.