Chinchwad News : कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या पोलीस अंमलदाराच्या वारसांची अनुकंपा तत्वावर नियुक्ती

एमपीसी न्यूज – पोलीस दलात काम करताना मृत्यू झालेले तसेच कोरोना काळात मृत्यू झालेल्या पोलीस अंमलदारांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर पोलीस शिपाई, कनिष्ठ श्रेणी लिपिक, कार्यालयीन शिपाई पदावर नियुक्त करण्यात आले. अशा दहा जणांना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते आज (बुधवारी, दि. 3) नियुक्तीपत्र देण्यात आले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आस्थापनेवरील 2018 पूर्वी पुणे शहर आणि पुणे ग्रामीण व इतर घटकातील दिवंगत अंमलदार विशेषतः कोरोना काळात मृत्यू झालेल्या पोलीस अंमलदाराच्या वारसांची पोलीस दलात अनुकंपा तत्वावर नियुक्ती करण्याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आदेश दिले होते. अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षा यादीमध्ये प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती.

_MPC_DIR_MPU_II

या समितीकडून अनुकंपा तत्त्वावरील संबंधित उमेदवारांना पोलीस मुख्यालय येथे उपस्थित राहण्याचे पत्र देण्यात आले. सात उमेदवारांची पोलीस मुख्यालयात शारीरिक मोजमाप व कागदपत्रांची पडताळणी झाली. पात्र उमेदवारांची वैद्यकीय व चारित्र्य पडताळणी करून त्यातील सहा उमेदवारांना आज पोलीस आयुक्तांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

अनुकंपा तत्वावर कनिष्ठ श्रेणी लिपिक म्हणून दोन उमेदवारांना तर वर्ग चार कार्यालयीन शिपाई पदावर दोन महिला उमेदवारांना देखील नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी निवड झालेल्या उमेदवारांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.