Chinchwad News: ऑटो क्लस्टर येथील कोविड हॉस्पिटलचे व्यवस्थापन बदला – अनुराधा गोरखे

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील ऑटो क्लस्टर मधील महापालिकेचे कोविड सेंटर संचलनाची जबाबादारी दिलेल्या “स्पर्श” या संस्थाबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. बेडसाठी पैसे घेतल्याची तक्रार नगरसेवकांनी केली आहे. त्यामुळे ऑटो क्लस्टर येथील कोविड हॉस्पिटलचे व्यवस्थापन तातडीने बदलण्याची मागणी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिंचवड येथील ऑटो क्लस्टर मध्ये महापालिकेचे कोविड सेंटर चालू असून “स्पर्श” या संस्थेकडे हे कोविड सेंटर चालवायला दिलेले आहे. परंतु, येथील मॅनेजमेंट कोविड सेंटर चालवण्यासाठी सक्षम नाही, हे वेळोवेळी निदर्शनास आलेले आहे. यापूर्वीही अनेक नगरसेवकांनी या सेंटर विषयी आवाज उठवला आहे. काल तर या कॉल सेंटर मधील डॉक्टरांनीच एका पेशंट कडून एक लाख रुपये घेतल्याची तक्रार नगरसेवकांकडे केली आहे.

या सेंटर बाबत अनेक तक्रारी वेळोवेळी स्थानिक नगरसेविका म्हणून माझ्याकडे येत असतात. तेथे पेशंटला नेहमीच दुय्यम वागणूक, तथा फोन न उचलणे, योग्य माहिती न देणे असे प्रकार चालूच असतात. मागील माझ्या प्रभागातील एका महिलेचे मंगळसूत्र चोरीचे प्रकरणही या सेंटर मध्ये घडले होते. या कोविड सेंटरची ताबडतोब मॅनेजमेंट बदलावी. सक्षम व्यवस्थापन तेथे ठेवावे जेणेकरून नागरिकांना याचा त्रास होणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.