Chinchwad News: पोलीस आयुक्तांनी महिलांना दिला स्वसंरक्षणाचा कानमंत्र

एमपीसी न्यूज: आपल्याकडे एखादा पुरुष वाईट नजरेने पाहत असेल किंवा वाईट भावनेने स्पर्श करीत असेल तर महिलांनी दुर्लक्ष करून त्या नराधमास चूक करण्यास प्रोत्साहन देवू नये. उलट दात, हात, पायाचा किंवा जोरात आरडाओरडा करून आपल्या अवयवांचा वापर करून अन्यायाचा प्रतिकार करावा. असा कानमंत्र पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी महिलांना दिला.

चिंचवड येथील औद्योगिक शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उडाण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कोरोना काळात कार्य केलेले डॉक्टर, नर्सेस,पोलीस,वैद्यकीय कर्मचारी समाजसेवक यांना उडाण पुरस्काराने सन्मानित करण्यात  आले.

यावेळी औद्योगिक शिक्षण मंडळाच्या संचालिका डॉ. प्रीती पाचपांडे, बालशास्त्रज्ञ मास्टर आदित्य पाचपांडे, आयआयबीआरचे  डॉ एस बी माथुर, आयपीएस कॅंपसचे संचालक डॉ सुधाकर बोकेफोडे, सीएस आयटी कॉलेजचे मुख्याध्यापक डॉ दत्तात्रय बाळसराफ, गीतामाता इंग्लिश मीडियम शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

आयुक्त कृष्ण प्रकाश पुढे म्हणाले कि, जगभर नुसताच महिला दिन साजरा केला.जीथे महिलांचा सन्मान होतो तीथे देवाचे अस्तित्व असते. नारी सन्मान हा महिलांच्या सशक्तीकरनातूच होईल.महिलांसाठी घर सांभाळणे हा मोठी परीक्षा असते.समाजात स्त्री पुरुष समानता जपली पाहीजे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीनाक्षी सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन विजया यमगर व लेखराज पाठक यांनी केले. तरन्नुम शेख यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.