Talegaon News : तळेगाव दाभाडे सीआरपीएफ शाळेतील मुलींना एक वर्षाचे सॅनिटरी नॅपकिन वाटप

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनानिमित्त हेंकेल अधेसिव टेक्नोलॉजीस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (हेंकेल इंडिया) ने, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) व व्ही2 केअर एचएसडब्लू फाउंडेशन आणि एनजीओच्या सहकार्याने, तळेगाव दाभाडे येथे कमी सुविधा असलेल्या शाळांसाठी मासिक पाळी स्वच्छता जागरूकता अभियान चालविले आहे. याअंतर्गत संपूर्ण वर्षभर पुरेल एवढे एक लाख सॅनिटरी नॅपकिन शाळेतील मुलींना वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुण्या श्वेता बापट,  दक्षिण आशिया हेड हेंकल टेक्नॉलॉजीचे भूपेश सिंह, कार्पोरेट हेड संध्या केडलया, पुणे हेड प्रसाद खंडागळे, जनरल सेक्रेटरी पद्मजा झा, सीआरपीएफचे डॉ. ए.  राधा, डी एल गोला आदी उपस्थित होते .

हेंकेल इंडियाचे सीएसआर कमिटी मेंबर भूपेश सिंग म्हणाले, स्त्रिया या आपल्या समाजाचा कणा आहेत आणि त्यांचे आरोग्य  हे सर्वात महत्त्वाचे आहे. या उपक्रमाद्वारे आम्ही किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढवत आहोत. कमी सुविधा असलेल्या भागातील किशोरवयीन मुलींनी उच्च दर्जाचे सॅनिटरी नॅपकिन वापरावे, सॅनिटरी नॅपकिन्सची सुरक्षित विल्हेवाट लावाली यासाठी आम्ही कार्य करत आहोत. पर्यावरणाच्या अनुकूलतेसाठी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानास पाठिंबा देणे हा आमचा उद्देश आहे.

हेंकेल द्वारे आम्हाला असे जाणवले की मासिक पाळीविषयी माहिती नसणे, स्वच्छताविषयक उत्पादनांचा आभाव आणि शाळेतील गैर-सोयीचे वातावरण यामुळे मुलींना शाळेत जाणे कठीण होऊ शकते. आमच्या मासिक पाळी स्वच्छता जागरुकता आणि सॅनिटरी नॅपकिन वितरण कार्यक्रमाद्वारे आम्ही  याविषयी जागरूकता निर्माण करू. याचबरोबर शाळांमधील मासिक पाळीशी संबंधित आव्हानांना तोंड देण्याचा प्रयत्न केला आहे.

या तरुण मुलींना मासिक पाळी आणि त्याची बेसीक बायोलॉजी अधिक चांगल्या प्रकारे समजून देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.  मासिक पाळीबद्दल सामान्यत: प्रचलित समज – गैरसमज दूर करण्यावर आमचा भर आहे. स्त्रियांना स्वच्छतेच्या पद्धतींचा अवलंब करण्यास मदत करणे हे आमचे ध्येय आहे जेणेकरूण त्यांचे आरोग्य सुधारेल  आणि मासिक पाळी बद्दलच्या समजातील धारणेस बदलता येईल.

मासिक पाळीच्या समस्यांमुळे मुली शाळा सोडतात या  समस्येचे निराकरण करण्यासाठी हेंकेल तर्फे आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही गुवाहटीमध्ये याआधीही असाच एक कार्यक्रम आयोजित केला होता. आता इंदौर,  अहमदाबाद आणि कानपूरमध्ये मासिक पाळी संबंधित शैक्षणिक आणि सहाय्यक उपक्रम राबवत आहोत. प्रत्येक केंद्रातील किमान दीड ते दोन हजार मुलींच्या जीवनात बदल घडवण्याचे आमचे ध्येय असल्याचेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.