Chinchwad News : डॉ. हर्षिता वाच्छानी व डॉ. राजेश्री ननावरे यांचा पीएचडी प्रदान

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज येथील डॉ. हर्षिता वाच्छानी व डॉ. राजेश्री ननावरे यांचा पीएचडी प्रदान करण्यात आली.

डॉ. हर्षिता वाच्छानी यांनी भोपाळ येथील सत्य साई युनिर्व्हसिटी ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड मेडीकल सायन्स येथे ‘डिझाईन ऑफ फ्रेमवर्क फॉर इन्फरमेशन सिक्युरिटी इशूज इन हेल्थकेअर आयओटी नेटवर्क’ या विषयावर संशोधन केले. त्यांना युनिर्व्हसिटीतील स्कुल ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन विभागाचे कुलगुरू डॉ. जितेंद्र शितलानी यांनी मार्गदर्शन केले.

तर, डॉ. राजेश्री ननावरे यांना अमरावती युनिर्व्हसिटीने गणित या विषयातून पीएचडी प्रदान करण्यात आली. त्यांनी ‘प्रॉपर्टीज ऑफ स्पेंक्ट्रल ऑपरेटर्स ऑन डिफरंन्ट क्लिनिअर पेसेस’ या विषयावर संशोधन केले. त्यासाठी येथील एल.टी. महाविद्यालयातील डॉ. एस.एम. पाध्ये यांनी मार्गदर्शन केले.

कमला शिक्षण संकुलचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी समवेत प्राध्यापकांनी त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.