Chinchwad News: विभागीय आयुक्तांकडून कोविड सेंटरची पाहणी

एमपीसी न्यूज – पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी नेहरूनगर व ॲटो क्लस्टर येथे उभारण्यात आलेल्या कोविड-19 सेंटरची आज (सोमवारी) पाहणी केली. रुग्णांची काळजी घेण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रविण तुपे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे उपस्थित होते.

राज्य सरकारने नेहरुनगर येथे जम्बो कोविड सेंटर उभारले आहे. तिथे कोविड रुग्णांवर उपचार केले जात आहेत. तसेच पालिकेच्या वतीने ॲटो क्लस्टर येथे सेंटर उभारण्यात आले आहे. सौरभ राव यांनी आज दोनही कोविड सेंटरची पाहणी केली.

यावेळी कोविड-19 सेंटरच्या बाबतीत येणाऱ्या समस्या व उपाययोजना बाबत चर्चा करण्यात आली. पालिका प्रशासनाला विविध सूचना केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.