Nigdi Crime News : सासरच्या त्रासाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या; चौघांना अटक

एमपीसी न्यूज – हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले. याप्रकरणी निगडी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. ही घटना अजंठानगर, चिंचवड येथे शनिवारी (दि. 3) रात्री घडली.

पती शुभम सतीश बगाडे (वय 21), सासरे सतीश ऊर्फ सत्यवान बगाडे (वय 48), सासू सविता सतीश बगाडे (वय 39), आजी सासू लीलाबाई अशोक ठोसर (वय 60) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच राजेंद्र अशोक ठोसर (वय 40) आणि विजय अशोक ठोसर (वय 38, सर्व रा. अजंठानगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत मृत नवविवाहितेच्या आईने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 जून 2020 रोजी फिर्यादी यांच्या मुलीचा आरोपी शुभम बगाडे याच्याशी विवाह झाला. लग्नानंतर आरोपींनी आपसांत संगनमत करून माहेराहून एक लाखांपैकी 80 हजार रुपये घेऊन ये, या कारणासाठी नवविवाहितेचा छळ केला.

या त्रासाला कंटाळून नवविवाहितेने शनिवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.