Chinchwad News : शिवसेनेच्यावतीने 108 जेष्ठांना एसटी स्मार्ट कार्डचे वाटप

एमपीसीन्यूज : शिवसेना विभागप्रमुख विशाल यादव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोहननगर-आकुर्डी प्रभागात आयोजित करण्यात आलेल्या एस.टी. महामंडळ स्मार्ट कार्ड शिबिरात पात्र ठरलेल्या 108 जेष्ठ नागरिकांना नुकतेच स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले.

शिवसेना नगरसेविका मीनल विशाल यादव यांचे जनसंपर्क कार्यालय तसेच शिवसेना मोहननगर शाखा कार्यालयात विभागप्रमुख विशाल यादव यांच्याहस्ते या स्मार्ट कार्डांचे वाटप करण्यात आले.  शाखाप्रमुख नागेश नामदे, राजू खजिनदार, स्वप्नील येवले, आकाश राजिवले, शशिकांत पाडाळे सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

जेष्ठ नागरिकांना एसटी बस प्रवास सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, हे कार्ड काढण्यासाठी जेष्ठ नागरिकांना पिंपरी चिंचवड शहरातील वल्लभगनगर एसटी आगारात जावे लागत होते. त्यात शहरात कोरोनाचे संकट आहे.

अशा परिस्थितीत जेष्ठांना स्मार्ट काढण्यासाठी होणारा त्रास आणि दगदग लक्षात घेत शिवसेना विभागप्रमुख विशाल यादव आणि नगरसेविका मीनल  यादव यांच्या पुढाकाराने प्रभागात मोफत एसटी स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराला जेष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या शिबिरात सहभागी झालेल्या १०८ जेष्ठ नागरिकांना विभागप्रमुख यादव यांच्या हस्ते स्मार्ट कार्डांचे वाटप करण्यात आले. हातात स्मार्ट कार्ड पडताच जेष्ठांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.