Chinchwad News : दिव्यांगांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी पाठपुरावा करणार-आमदार अण्णा बनसोडे

एमपीसीन्यूज : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून आमदार अण्णा बनसोडे यांनी शहरातील दिव्यांग नागरिकांना शुभेच्छा दिल्या असून त्यांच्या कार्यालय ठिकाणी झालेल्या एका छोटेखाणी कार्यक्रमात दिव्यांग प्रतिनिधींचा आमदार बनसोडे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या वेळी दिव्यांग संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यासाठी निवेदन आमदार बनसोडे यांना दिले. त्यावर दिव्यांगांच्या समस्या व अडचणी सोडविण्याची ग्वाही आमदार बनसोडे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिव्यांग योजना राबविण्यासाठी सहाय्यक आयुक्त नेमावा, मनपा अर्थसंकल्पामध्ये दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठी राखीव असलेला निधी नाविन्यपूर्ण योजनांची आखणी करून पूर्णपणे वापरावा, दिव्यांगांसाठी रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम महापलिकेने राबवावा, दिव्यांगांसाठी शासनाने घालून दिलेल्या अटी नुसार आरक्षण तरतुदी ठेवण्यात याव्यात व त्याची अंमलबजावणी करावी, घरकुल अथवा पंतप्रधान आवास योजनेच्या पायाभूत रक्कमेत ५० टक्के सूट देण्यात यावी, मनपा रुग्णालये व दवाखान्यामधून दिव्यागांना मोफत उपचार मिळावेत या मागण्यासह १००० स्क्वेर फुट पर्यंत घर असलेल्या दिव्यांग नागरीकास मिळकत करामध्ये 50 टक्के सवलत महानगरपालिकेने द्यावी अशा मागण्यासाठी दिव्यांग प्रतिनिधींनी आग्रह धरला.

_MPC_DIR_MPU_II

त्यावर आश्वासन नाही तर प्रत्यक्ष कार्यवाही करणार असून आचारसंहिता संपताच याबाबत पालकमंत्र्याकडे बैठक घेऊन पाठपुरावा करू, अशी ग्वाही बनसोडे यांनी दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड दिव्यांग सेलचे अध्यक्ष अशोक कुंभार, आनंद बनसोडे, रवी भिसे, बाळासाहेब तरस, योगेश सोनार, विजय भालेराव, गीता भिसे, नवीना खंडागळे, किरण भिसे, धनाजी कांबळे, बाळू साळुंके, मोहम्मद शफी पटेल व दादासाहेब काशीद आदी दिव्यांग प्रतिनिधी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.